भाजप ठाणे विभागीय बैठक संपन्न
भाजप ठाणे विभागीय बैठक संपन्न
ठाणे ( प्रतिनिधी) : भाजप महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ठाणे विभागीय संघटनात्मक बैठक पार पडली. या बैठकीदरम्यान संघटनात्मक कामाचा आढावा घेण्यात आला, तसेच आगामी पक्षकार्याचे नियोजन करण्यात आले. यावेळी पुढील वाटचालीसाठी आवश्यक विषयांवर उपस्थितांशी रवींद्र चव्हाण यांनी संवाद साधला.
ठाणे येथील पक्ष कार्यालयात झालेल्या या बैठकीप्रसंगी भाजपा महाराष्ट्र प्रदेश संघटन मंत्री अजय जामवाल, सहसंघटन मंत्री सतीश धोंड, खासदार डॉ. हेमंत विष्णू सवरा, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष केशव उपाध्ये, प्रदेश सरचिटणीस आ. योगेश सागर, प्रदेश सरचिटणीस आ. निरंजन डावखरे, प्रदेश सरचिटणीस आ. माधवीताई नाईक, प्रदेश मुख्यालय प्रभारी रवि अनासपुरे, ठाणे-कोकण विभाग सहसंयोजक संजय वाघुले, ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संदीप लेले, कल्याण जिल्हाध्यक्ष नंदू परब आदी मान्यवरांसह ठाणे विभागातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Most Popular News of this Week
भाजप ठाणे विभागीय बैठक संपन्न
भाजप ठाणे विभागीय बैठक संपन्नठाणे ( प्रतिनिधी) : भाजप महाराष्ट्र प्रदेश...
